महाराष्ट्र

“रश्मीताई, तालिबानी प्रवृत्तीच्या मुसक्या कधी आवळणार ?”

Published by : Lokshahi News

मुंबईतील साकिनाका बलात्कार प्रकरणात सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सूरू आहेत. त्यात याच मुद्यावर शिवसेनेचे मुखपत्र सामनातून अग्रलेख प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अग्रलेखावर भाजपाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी शिवसेनेवर आणि विशेषत: संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.

संजय राऊत यांचा सामनातला अग्रलेख म्हणजे त्यांच्यातील महिलांबाबतची असणाऱ्या तालीबानी प्रवृतीचं हे उदाहरण आहे. मला सामनाच्या सर्वेसर्वा रश्मीताई ठाकरे यांना हेच विचारायचे आहे की,अशा तालीबानी प्रवृत्तीच्या तुम्ही मुसक्या कधी आवळणार ? असा सवाल चित्रा वाघ यांनी विचारत घणाघाती टीका केली आहे.
अहो राऊत….एका महिलेवरती अमानवीय अत्याचार झालेला आहे त्यामुळे तिचा ज्या यातनेने मृत्यू झाला असेल तुम्हाला ते या जन्मातही समजणार नाही.अशा दुर्दैवी घटनेवरती राजकारणाची पोळी भाजण्यासाठी तिचा वापर करता आणि महाराष्ट्र आणि उत्तरप्रदेशची तुलना करता अशी टीकाही चित्रा वाघ यांनी केली आहे.

संजय राऊत, तुम्ही मुंबई सिपी केंव्हापासून झालात?? तपास पुर्ण व्हायच्या आधीच तुम्ही अग्रेलखातून अत्याचार करणारा 'एकच' नराधम होता असे घोषीत करताय.. ही धडपड कुणाला वाचवण्यासाठी.. की ही विकृती.. अशी टीका वाघ यांनी राऊतांवर केली.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा