थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Mahad Shivsena Vs NCP) महाड नगर पालिका निवडणुकीदरम्यान शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये काल मतदानाच्यावेळी राडा झाला. या राड्या प्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राष्ट्रवादी कार्यकर्ते सुशांत जाबरे यांनी महाड तालुका पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली असून मतदान केंद्रावर आढावा घेण्यासाठी गेलो असता शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी गाड्या फोडल्या, सोबतच्या व्यक्तींना मारहाण केली, अंगरक्षकाकडील रिव्हॉल्वर हिसकावुन घेतली आणि सोन्याची चेन, मोबाईल लंपास केल्याची तक्रार करण्यात आली आहे.
या मारहाणीमध्ये जाबरे यांच्या सोबतच्या पाच जणांना गंभिर दुखापत झाल्याचे देखील तक्रारीत नमुद करण्यात आले आहे. याप्रकरणी शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांच्यासह आठ जणांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विकास गोगावले, महेश गोगावले, विजय मालूसरे, प्रशांत शेलार, धनंजय मालूसरे, वैभव मालूसरे, सुरज मालूसरे, सिद्धेश शेठ आणि इतर अनोळखी आठ ते दहा जणांविरोधाता हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री उशिरा हा गुन्हा महाड तालुका पोलीस ठाण्यात दाखल करुन या प्रकरणी कोणासही अद्याप अटक करण्यात आलेली नाही.
Summery
महाड मधील शिवसेना - राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांमधील राडा प्रकरण
शिवसेना नेते विकास गोगावले यांच्यासह आठ ते दहा जणांविरोधात गुन्हा दाखल
महाड पोलिस ठाण्यात राष्ट्रवादीचे सुशांत जाबरे यांची तक्रार