महाराष्ट्र

शिवेंद्रसिंहराजे आणि उदयनराजे समर्थकांमध्ये राडा

Published by : Lokshahi News

साताऱ्यात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि खासदार उदयनराजे भोसले समर्थकांमध्ये सशस्त्र राडा झाल्याची घटना घडली आहे. दोन्ही गटांच्या तुफान हाणामारीतून सहा जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती आहे.

साताऱ्यात बुधवारी रात्री सव्वा आठच्या आसपास उदयनराजे समर्थक सनी भोसले हा त्याच्या मित्रांसमवेत दुर्गा पेठेत गेला होता. याच ठिकाणी शिवेंद्रराजे समर्थक बाळासाहेब खंदारे यांचे कार्यालय आहे. कार्यालयासमोरच गाडी लावल्याने खंदारे आणि भोसले गटातील कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची सुरू झाली. या बाचाबाचीचे रूपांतर मारामारीत झाले. दोन गटांमध्ये उडालेल्या या धुमश्चक्रीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या मारामारीत शस्त्रांचा वापर झाल्याचे चर्चा आहे.

याप्रकरणी नगरसेवक बाळू खंदारेसह आकाश नेटके, शुभम भिसे, शैलेश बडेकर, निखिल किर्तीकर यांच्यासह इतर अनोळखी ८ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी सनी मुरलीधर भोसले (सर्व रा. सातारा) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. या मारामारीत पाच जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेदरम्यान, या सर्व घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : मनसेचे नेते संदीप देशपांडे यांची आज पत्रकार परिषद

Latest Marathi News Update live : रायगडच्या उरणजवळ समुद्रात बोट बुडाली

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींचे आरोग्य चांगले राहील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

आजचा सुविचार