थोडक्यात
जळगावमध्ये पाचोरा तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस
सोन नदीला पूर, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान
कळमसरा येथे सलग तिसऱ्या दिवशी पाऊस
(Jalgaon Heavy Rain ) राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. अनेक भागात मोठे नुकसान झाल्याचे पाहायला मिळत असून जळगावच्या पाचोरा तालुक्यात पुन्हा एकदा ढगफुटीसदृश पाऊस झाला.
या पावसाने सोन नदीला पूर आला असून शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. जोरदार पावसामुळे कापसासह नुकतीच काढणी केलेल्या मका, ज्वारी या पिकांचं भिजून नुकसान झालं आहे. कळमसरा येथे सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस पडला आहे.
सोन नदीला पूर आल्याने गावातील मुख्य रस्त्यांवर पाणी साचल्याचे पाहायला मिळत आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत अधिक भर पडली आहे. अनेक भागात पाणी साचून घरांचे नुकसान झाले. कापूस वेचणीची कामे ठप्प झाली असून, शेतात वेचलेला कापूस ओला झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.