CM Devendra Fadnavis 
महाराष्ट्र

CM Devendra Fadnavis: मालवणी परिसराच्या पुनर्विकासासाठी 'क्लस्टर मॉडेल' विकसित करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

Malvani Redevelopment: मालवणी परिसरातील झोपडपट्ट्यांचा जलद व एकत्रित पुनर्विकास करण्यासाठी ‘क्लस्टर मॉडेल’ राबवण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

Published by : kaif

मालवणी परिसरातील झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास करताना ' क्लस्टर मॉडेल ' विकसित करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देत या परिसरातील अंबुजवाडी, दादासाहेब गायकवाड नगर व राजीव गांधी नगर येथील झोपड्यांचे सर्वेक्षण पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. बैठकीस गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, आमदार असलम शेख उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मालवणी परिसरातील झोपड्यांचे राहिलेले सर्वेक्षण पूर्ण करावे. म्हाडा व झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण यांच्याकडे असलेल्या क्षेत्रानुसार त्यांनी सर्वे करावा. मालवणी परिसरातील संपूर्ण झोपड्यांचा सर्वे झाल्यानंतर यंत्रणांनी एकत्रितरित्या अहवाल द्यावा. कायदेशीर अडचणी असलेल्या क्षेत्राविषयी स्वतंत्रपणे कार्यवाही करावी. ज्या ठिकाणी विकासाची कामे असतील, ती क्षेत्रे पुनर्विकासासाठी प्राधान्याने घ्यावीत.

'क्लस्टर मॉडेल' ने विकास केल्यास संपूर्ण मालवणी परिसराचा कमी कालावधीत पुनर्विकास होईल. ही झोपडपट्टी पुनर्विकासाचा मोठा प्रकल्प आहे. या प्रकल्पास गतीने पूर्णत्वास न्यावे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

बैठकीस अपर मुख्य सचिव (गृहनिर्माण) असीम कुमार गुप्ता, गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ . महेंद्र कल्याणकर आदी उपस्थित होते. तसेच दूरदृश्य प्रणाली द्वारे मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी सहभागी होते. बैठकीत सादरीकरण म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी केले.

मालवणी परिसरातील जमिनीचे क्षेत्रफळ 641 एकर आहे. यामध्ये राज्य शासन, म्हाडा, महापालिका आणि खासगी जमिनीचा समावेश आहे. त्यापैकी 565.98 एकर क्षेत्रावर झोपडपट्टी आहे. तसेच 75.02 एकर क्षेत्र खुले आहे. या परिसरातील अंदाजे झोपड्यांची संख्या 14 हजार इतकी आहे. परिसराच्या पुनर्विकासानंतर हे क्षेत्र झोपडपट्टीमुक्त होईल.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा