CM Devendra Fadnavis 
महाराष्ट्र

CM Devendra Fadnavis: फडणवीसांचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल, 'लाव रे तो व्हिडीओ!' शिवतीर्थावर सभा फडणवीस कडाडले

Thackeray Brothers: शिवतीर्थावरील महायुतीच्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंवर जोरदार हल्ला चढवला. ‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणत त्यांनी युतीवर टीका केली.

Published by : Dhanshree Shintre

महाराष्ट्रातील २९ महापालिका निवडणुकीचा निकाल १६ जानेवारीला जाहीर होणार असून, मुंबई महानगरपालिका केंद्रस्थानी आहे. ११ जानेवारीला शिवतीर्थवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संयुक्त सभेला प्रत्युत्तर म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आजच शिवतीर्थवर महायुतीची सभा घेतली. फडणवीसांनी ठाकरे बंधूंच्या युतीची खिल्ली उडवत "लाव रे तो व्हिडीओ" म्हणत राज ठाकरेंच्या शैलीत त्यांच्यावर हल्लाबोल केला.

फडणवीस म्हणाले, "महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकवण्यासाठी पुन्हा एकत्र आलो आहोत. आज स्वामी विवेकानंद जयंती आहे, त्यांनी हिंदू संस्कृती आणि भगवा झेंडा जगासमोर नेला. इतक्या सभा घेण्याची गरज नाही, पण माझ्यासाठी हा संवाद आहे. काही गोष्टी वेगळ्या संवादात बोलावे लागतात." यानंतर त्यांनी ठाकरे बंधूंच्या एकमेकांवर केलेल्या टीकेचे व्हिडीओ दाखवले. राज ठाकरे उद्धव ठाकरेंवर सडकून टीका करताना आणि उद्धव राज ठाकरेंवर हल्लाबोल करताना दिसले. "सत्तेसाठी बनवाबनवी चालू आहे," असे फडणवीस म्हणाले.

पुढे बोलताना फडणवीस यांनी स्पष्ट केले, "काहीही झाले तरी मुंबईचा महापौर मराठीच होईल. कोणाचा बाप आला तरी मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करता येणार नाही." या सभेने राजकीय वातावरण ढवळून निघाले असून, १५ जानेवारीला होणाऱ्या मतदानानंतर निकालाची उत्सुकता वाढली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये मुंबईवरून स्पर्धा तीव्र आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा