महाराष्ट्र

बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा नाहीच; एकनाथ शिंदे यांचं नवं ट्विट

बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या विचारांशी प्रतारणा करणार नाही, अशी भूमिका त्यांनी या माध्यमातून मांडली आहे.

Published by : Shweta Chavan-Zagade

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी त्यांची भूमिका मांडणारं आणखी एक ट्विट केलं आहे. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या विचारांशी प्रतारणा करणार नाही, अशी भूमिका त्यांनी या माध्यमातून मांडली आहे. याचदरम्यान एकनाथ शिंदेंनी गुरुपौर्णिमेनिमित्त बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांना अभिवादन केलं आहे.

आज गुरुपौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक नवे ट्विट केले आहे. ”बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा नाहीच. विझणार कधीच अंगार नाही, हिंदुत्वाशिवाय विचार नाही….गुरुपौर्णिमेनिमित्त विनम्र अभिवादन…” असे एकनाथ शिंदे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचा फोटो पोस्ट करत त्यांना गुरुपौर्णिमेनिमित्त अभिवादन केले आहे.

”आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत… बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही,” अशी ग्वाही याआधीही एकनाथ शिंदे यांनी दिली होती.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?