थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Devendra Fadnavis) आगामी महापालिका निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. एबी फॉर्मचं वाटप करण्यात आले. अनेकांना उमेदवारी नाकारल्याने इच्छुकांनी नाराजी व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले.
तसेच उमेदवारी न मिळाल्याने नाराज होत कोणी राजीनामा दिला तर कोणी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरत बंडखोरी केली. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी गोंधळाची स्थिती पाहायला मिळाली. आता ज्यांनी बंडखोरी केली आहे त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहे.
याच पार्श्वभूमीवर आता बंडखोरांना शांत करण्यासाठी मुख्यमंत्री मैदानात उतरल्याचे पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री फडणवीस स्वत: बंडखोरांशी संपर्क करणार असल्याची माहिती मिळत आहे. राज्यातील प्रमुख शहरातील बंडखोरांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून संपर्क साधण्यात येणार असून निवडणुकीत माघार घेण्याबाबत मुख्यमंत्र्यांचा अनेक अपक्षांसोबत संवाद असणार आहे.
Summary
बंडखोरांना शांत करण्यासाठी मुख्यमंत्री मैदानात
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत: करणार संपर्क
राज्यातील प्रमुख शहरातील बंडखोरांशी संपर्क