थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Breaking News ) मालवणी परिसरात अंमली पदार्थविरोधी कारवाई करत पोलिसांनी सुमारे 180 ग्रॅम कोकेन जप्त करून एका परदेशी नागरिकाला अटक केली आहे. जप्त केलेल्या कोकेनची आंतरराष्ट्रीय बाजारमूल्य तब्बल 72 लाख रुपये असल्याचे समोर आले आहे.
अटक केलेल्या व्यक्तीकडे पासपोर्ट आणि व्हिसा नसल्याची माहिती मिळाली असून तो देशात कसा आला याचा तपास सुरू करण्यात आला आहे. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी मालवणी परिसरात सापळा रचला.
त्या वेळी संशयास्पद हालचाली करणाऱ्या एका परदेशी व्यक्तीस ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा नोंदवून आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
Summery
मालवणी परिसरात 72 लाखांचे कोकेन जप्त
कोकेन विक्री करणाऱ्या नायजेरियन नागरिकाला अटक
आरोपीवर गुन्हा नोंदवून केलं न्यायालयात हजर