थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Maharashtra Weather Update) राज्यात थंडीची चाहूल लागली असून, अनेक जिल्ह्यांमध्ये थंडी जाणवू लागली आहे. धुक्याची चादर पसरलेली पाहायला मिळत आहे. अनेक शहरांमध्ये तापमानाचा पारा हा घसरलेला आहे.
यातच आता राज्यात थंडी कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून गेले 2 दिवस राज्यातील तापमानात वाढ झाली आहे. राज्यात पूर्वेकडून वारे वाहत असून आर्द्रता देखील वाढली असून उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रवाह कमी झाला आहे.
बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार होण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत असून अनेक ठिकाणी पाऊस बरसणार असल्याचा अंदाज आहे.
Summery
राज्यात थंडी कमी होण्याची शक्यता
कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज
गेले 2 दिवस राज्यातील तापमानात वाढ