Maharashtra weather  
महाराष्ट्र

Maharashtra Weather : राज्यभरात थंडीचा कडाका वाढला! 'या' ७ जिल्ह्यांमध्ये थंडीच्या लाटेसाठी यलो अलर्ट जारी

Cold Wave Alert: महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला असून, सात जिल्ह्यांमध्ये शीत लहरीचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Published by : Dhanshree Shintre

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

मुंबईसह महाराष्ट्र राज्यभर थंडीचा कडाका वाढला असून, हवामान विभागाने सात जिल्ह्यांत थंडीच्या लाटेचा यलो अलर्ट जारी केला आहे. उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे तापमानाचा पारा घसरण्यात आहे आणि अनेक ठिकाणी तो १० अंशांपर्यंत खाली आला आहे. धुळे, नाशिक, नंदुरबार, अहिल्यानगर, पुणे, सोलापूर आणि जळगाव या जिल्ह्यांत थंडीची लाट पसरेलची शक्यता वर्तवली असून, राज्यभर किमान तापमान १५ अंशांखाली गेले आहे.

मुंबईतही शुक्रवारी पहाटेपासून थंडीने झुळूक घातली असून, शनिवारी किमान तापमान १५ अंशांपर्यंत पोहोचले. रविवारी थोडाफार वाढ होईल आणि तापमान १८ अंशांपर्यंत राहील, तरी ३१ डिसेंबरपर्यंत थंडीचा कहर कायम राहील असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. मध्य महाराष्ट्रात विशेषतः थंडीची तीव्रता वाढेल आणि नागरिकांना हुडहुडी भरेल.

उत्तरेकडे गारठा वाढल्याने राज्यात शीत लहर येत असल्याने कडाक्याची थंडी पडली आहे. महिनाभर अशीच थंडी राहण्याचा अंदाज आहे. मुंबईतही पहाटे थंडी वाढली आहे. 15 अंशांच्या आपसास तापमानाची नोंद झाली. 31 डिसेंबरपर्यंत हवामान थंड राहील, तापमानाचा पारा कमी राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

जळगाव जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून शीतलहर जोरात असून, किमान तापमान ७ अंशांपर्यंत खाली येऊन जिल्हावासीय त्रस्त झाले आहेत. या थंडीच्या कडाक्यामुळे दोन मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. एमआयडीसीतील गोविंद इंडस्ट्रीज चटई कारखान्यातून गुरुवारी रात्रपाळी करून घरी परतलेल्या रवींद्र टेंगरी प्रसाद (४९, रा. उत्तर प्रदेश) यांचा खोलीत झोपेतच मृत्यू झाला. दुसरीकडे, नशिराबाद येथे खंडेराव मंदिराच्या ओट्यावर वामन भगवान लकडे (७६, रा. रायपूर, बुलढाणा) यांचा मृतदेह आढळला. वैद्यकीय सूत्रांनी दोन्ही प्रकरणांत थंडीमुळे गारठून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा