थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
( Maharashtra Weather ) राज्यात थंडीचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता आहे. किमान तापमानात घट असल्याने गारठ्याचे प्रमाण अधिक असून मागील काही दिवसांपासून राज्यात गारठा कायम आहे. पुढील दोन - तीन दिवस मध्य महाराष्ट्र, खानदेश आणि विदर्भात थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
थंडीची लाट पुढील दोन तीन दिवस कायम असल्याने गारठ्याचे प्रमाण सर्वाधिक राहील. उत्तर भारतातून थंड हवेचे प्रवाह वाढल्याने राज्यात थंडीचे प्रमाण वाढले आहे. अनेक भागातील किमान तापमानात घट झाली आहे. काही भागात सरासरीपेक्षा कमी किमान तापमानाची नोंद झाली आहे.
हवामान विभागाच्या सांताक्रूझ केंद्रात मंगळवारी १६.५ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक, नाशिक घाट परिसर, अहिल्यानगर, पुणे, पुणे घाट परिसर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, अमरावती, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ या भागात पुढील काही दिवस गारठा कायम राहण्याची शक्यता आहे.
Summery
राज्यात थंडीचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता
थंडीची लाट पुढील दोन तीन दिवस कायम असल्याने गारठ्याचे प्रमाण सर्वाधिक राहील
उत्तर भारतातून थंड हवेचे प्रवाह वाढल्याने राज्यात थंडीचे प्रमाण वाढले