थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Election Commissions) 29 महानगरपालिकांमध्ये आज मतदान होणार आहे. सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून असून संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.
या निवडणुकीत शाईऐवजी मार्कर पेनचा वापर करण्यात येत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे शाई पुसली जात असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर आता राज्य निवडणूक आयोगाने यावर स्पष्टीकरण दिल्याचे पाहायला मिळत आहे.
राज्य निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, 'शाई पुसली जाते याबाबत चौकशी सुरू असून मार्करने बोटावर शाही गडद रंगात लावावी अशी सूचना देण्यात आली आहे. मार्कर पेन या आधीच्या पालिका निवडणुकीत वापरला गेला आहे. असे निवडणूक आयोगाने सांगितले आहे.
Summary
राज्य निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
'शाई पुसली जाते याबाबत चौकशी सुरू'
मार्करने बोटावर शाही गडद रंगात लावावी अशी सूचना