Nalasopara School  
महाराष्ट्र

Nalasopara School : शाळेत बांगलादेशचा झेंडा फडकवल्याने वाद; नालासोपाऱ्यातील इंटरनॅशनल स्कूलच्या परिसरातील घटना

नालासोपाऱ्यातील शाळेत बांगलादेशचा झेंडा फडकवल्याने आता वाद निर्माण झाला आहे.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Nalasopara School) नालासोपाऱ्यातील शाळेत बांगलादेशचा झेंडा फडकवल्याने आता वाद निर्माण झाला आहे. नालासोपारा येथील रायन इंटरनॅशनल स्कूलच्या आवारात बांगलादेशचा झेंडा फडकवण्यात आल्याची घटना घडली असून यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

ही बाब निदर्शनास येताच हिंदुत्ववादी कार्यकर्ते पोलिसांसह शाळेत दाखल झाले. त्यांनी तात्काळ तो झेंडा हटवून शाळा प्रशासनाला कडक इशारा दिला. या घटनेनंतर सामाजिक कार्यकर्त्यांनी संबंधित शाळेवर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. मात्र, अद्याप कोणतीही अधिकृत कारवाई झालेली नसल्याने नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

Summary

  • शाळेत बांगलादेशचा झेंडा फडकवल्याने वाद

  • नालासोपाऱ्यातील इंटरनॅशनल स्कूलच्या परिसरातील घटना

  • शाळेवर कठोर कारवाई करण्याची मागणी

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा