(Maharashtra Corona Update ) कोरोनाच्या या महामारीमुळे सारं जग सावरलेलं असतानाच आता पुन्हा एकदा कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याची माहिती मिळत आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होताना पाहायला मिळत आहे.
राज्यात एकाच दिवशी कोरोनाच्या 114 नव्या रुग्णांची नोंद झाली असून एकाचा मृत्यू झाली असल्याची माहिती मिळत आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना पाहायला मिळत आहे.
114 नवे रुग्ण सापडल्याने रुग्णांची संख्या 1 हजार 276 वर पोहोचली आहे. कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनमुळे धोका वाढला असल्याचे पाहायला मिळत आहे. भारतातील अनेक राज्यांमध्ये कोविडच्या प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसत आहे. नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्या आणि सतर्क राहा, आणि लक्षणं आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या असं सांगण्यात येतं आहे.