गेल्या काही दिवसांत कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहे. त्यामुळे लोकांना पुन्हा 2020 सालच्या कटू आठवणी दाटून आले आहेत. पण सगळ्यांनी लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे, सध्याचा कोरोना तितका धोकादायक नाही, पण महत्त्वाचं म्हणजे, सध्या कोरोना रुग्णांचे जे आकडे समोर येतायत, त्यावरूनही राजकारण सुरू झाल आहे. वाचा याबद्दलचा हा स्पेशल रिपोर्ट.
25 मार्च 2020 ही तीच तारीख आहे. ज्यादिवशी देशातले रस्ते सुनसान झाले. सगळंच्या सगळं जागच्या जागी थांबलं होतं. कारण याच दिवशी लागला होता. लॉकडाऊन कोरोनाची दहशत... दुसरं काय? आता या गोष्टीला पाच वर्ष झाली. मधल्या काळात सगळं सुरळीत झालं. सगळं विसरून माणसं पुन्हा नव्या उमेदीने जगायला लागली, पण... आता पुन्हा तो आला आहे. तोच ज्याची सगळ्यांना दहशत असते, तो म्हणजे कोरोना. सध्या भारतामध्ये एक हजारहून अधिक कोरोनाचे रुग्ण आहेत. तर महाराष्ट्रात हाच आकडा 278 वर पोहोचला. हे आकडे गेल्या काही दिवसांत वाढत आहेत. पण सध्या आलेल्या कोरोनाचा व्हेरियंट हा धोकादायक नसल्याचं ज्येष्ठ आरोग्यतज्ज्ञ सांगता आहेत.
आरोग्य तज्ज्ञ डॉ. रवी गोडसे, ज्येष्ठ यांनी आपला व्हिडिओमध्ये बोलतात की, "कोरोना परत आला आहे म्हणे. WHO ने त्याचं बारसंदेखील केलं आहे. NB.1.N.1 असं नावदेखील ठेवलं आहे. पण यामध्ये काहीही टेंशन घेण्यासारखे नाही. तो परत आला आहे. म्हणजे तो कुठे बाहेर गेला होता का? फिरायला पाठवलं होतं? विमान पकडून येणार आहे का? सगळ्या जगात तो होताच. पण आता तुम्ही केसेस मोजायला सुरुवात केलीत म्हणून तुम्हाला सापडत आहेत. हा साधा सर्दी खोकला आहे. तपासण्या बंद केल्या तर आपोआप केसेस मिळणं कमी होईल. आत्मा जसा अमर असतो तसा आता कोरोना झाला आहे. आत्मा जसा शरीर बदलतो तसा हा माध्यमं बदलतो".
महाराष्ट्रात जानेवारी 2025 मध्ये केलेल्या चाचण्या- 7830
जानेवारी 2025 पासून आतापर्यंत 87 रुग्ण बरे झाले
गुरुवार 29 मेपर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या- 278
मुंबई- 37, पुणे - 2, पिंपरी-चिंचवड- 1, ठाणे- 19
लातूर- 1, नवी मुंबई- 7, रायगड- 1, कोल्हापूर- 1
जानेवारी 2025 पासून मुंबईमधील रुग्णसंख्या- 285
एकीकडे कोरोनाच्या रुग्णांचे वाढते आकडे समोर येत असताना, हे आकडे लपवले जातायत का? असा संशयही व्यक्त केला जातो. महत्त्वाचं म्हणजे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोरोना रुग्णांच्या आकड्यांचा काही संबंध आहे का? असाही संशय बोलून दाखवला जात आहे.
माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी लोकशाही मराठीसोबत संवाद साधला आहे. त्यावेळेस त्या म्हणाल्या की,
खरंतर, कोरोनाची साथ जेव्हापासून आली तेव्हापासूनच रुग्णांच्या आकड्यांवरून आरोप प्रत्यारोप केले गेले. सत्तेतले बाहेर गेले, बाहेरचे सत्तेत आले. तरी आताही तसे आरोप होतच आहेत,ते काही असो लोकांनी एकच लक्षात ठेवायला हवं की सध्याच्या कोरोनाची लक्षण तीव्र नाहीत. जीव जाण्याचा धोकाही तसा फारसा नाही. तरीही काळजी घेणं एवढं आपल्या हातात आहे. ते आपण नेमकेपणाने करायला हवं... एवढं नक्की