महाराष्ट्र

गणरायाच्या विसर्जन सोहळ्यावर कोरोनाचं सावट

Published by : Lokshahi News

राज्यात आज अनंत चतुर्दशीचा दिवस. बाप्पाचे आगमन झाले आणि बघता बघत आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली. मात्र करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे यंदाच्या वर्षीही गणेशभक्तांच्या आनंदावर विरजण पडलं आहे. गेल्यावर्षीप्रमाणेच याही वर्षी शांततेत आणि अनेक नियमांचं पालन करुन भक्तांना बाप्पाला निरोप द्यावा लागणार आहे.

पुण्यातल्या मानाच्या पाच गणपतींचं यंदा उत्सव मंडपासमोरच विसर्जन होणार असून सकाळी ११ वाजता कसबा गणपतीचं विसर्जन होईल. त्यानंतर मानाच्या इतर चारही गणपतींचं विसर्जन होणार आहे. गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर आज पुणे शहरातली सर्व दुकानं बंद राहणार असून केवळ हॉटेल्स आणि अत्यावश्यक सेवा देणारी दुकानं सुरू राहणार आहेत. गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर होणारी गर्दी लक्षात घेता पुण्यातला बाजीराव रस्ता, लक्ष्मी रस्ता, केळकर रस्ता, कुमठेकर रस्ता आणि शिवाजी रस्ता आज दिवसभर वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. शहरात आज सात हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

तर मुंबईतल्या भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या लालबागचा राजाचं विसर्जनही यंदा कोणताही गाजावाजा न करता होणार आहे. दुपारी १२ ते सायंकाळी ५.३० या वेळात नेहमीच्या मार्गाने ट्रकवरुन मूर्ती विसर्जनासाठी नेण्यात येईल. यादरम्यान कोणतीही मिरवणूक नसून पदयात्राही काढण्यात येणार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गात कोणत्याही भाविकाला रस्त्यावर येऊन दर्शन घेता येणार नाही. फुटपाथच्या आतच उभं राहून भाविकांना आपल्या आराध्याचं दर्शन घेता येणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : विजयी मेळाव्यासाठी मनसे आणि शिवसेनेचे नेते वरळी येथील डोम सभागृहात दाखल

Sandeep Deshpande : 'आवाज मराठीचा!', विजयी मेळाव्यासाठी संदीप देशपांडेंचा खास टी-शर्ट; मराठीची मुळाक्षरेही दिसताहेत उठून

Maharashtra Rain Update : राज्यात पावसाचा जोर कायम; साताऱ्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

Satara School : 'या' तालुक्यातील 334 शाळांना पावसाळी सुट्टी जाहीर