महाराष्ट्र

नगरसेविकेच्या मुलाचा डोक्यात गोळी लागल्यानं मृत्यू

Published by : Lokshahi News

पिंपरी-चिंचवडमध्ये नगरसेविकेच्या मुलाने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली आहे. रात्री उशिरा उपचारदरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. प्रसन्न शेखर चिंचवडे असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. प्रसन्न अवघ्या २१ वर्षांचा होता. करुणा शेखर चिंचवडे असे मृत प्रसन्नच्या आईचे नाव असून त्या भाजपाच्या नगरसेविका आहेत. ही घटना रविवारी रात्री सव्वानऊच्या सुमारास घडली आहे.

चिंचवडमधील राहत्या घरात प्रसन्नने वडिलांच्या परवानाधारक पिस्तूलातून डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. ही घटना रविवारी रात्री सव्वानऊ वाजता घडली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पिस्तूलातून गोळी झाडल्यानंतर झालेल्या आवाजामुळे ही घटना उघडकीस आली. जखमी प्रसन्नला तातडीने खासगी रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं. मात्र, रविवारी रात्री उशिरा उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती चिंचवड पोलिसांनी दिली आहे.

दरम्यान, पिस्तुलाशी खेळताना चुकून प्रसन्नला गोळी लागली नाही ना याचा तपास आता पोलीस घेत आहेत. त्यामुळे ही आत्महत्या की अपघात याचा शोध घेणं सुरू आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुणे दौऱ्यावर

Peanut Kadhi Recipe : आषाढीच्या उपवासाला तयार करा चविष्ट शेंगदाण्याची कढी

गरमागरम डाळ, भात अन् त्यावर तूप घालून खाण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहिती आहेत का? जाणून घ्या

Sanjay Raut : 'राज्याच्या सामाजिक, राजकीय वातावरणात नवे बदल घडणार'; संजय राऊतांचं विजयी मेळाव्याबाबत सूचक वक्तव्य