थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Sindhudurg) राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी झालेल्या मतदानाचा आज निकाल येणार आहे. सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. 02 डिसेंबर 2025 रोजी 263 नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी मतदान झाले. तर शनिवारी 23 ठिकाणी उर्वरित मतदान पार पडले.
मतमोजणी केंद्राबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून निवडणूक अधिकाऱ्यांनी मतमोजणीची तयारी सुरू केली आहे. सुरुवातीला पोस्टल मतदानाची मते मोजली जातील आणि त्यानंतर ईव्हीएममधील मतांची मोजणी सुरू होईल. याच पार्श्वभूमीवर आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक नगरपंचायत तर तीन नगरपरिषदेसाठी आज मतमोजणी होणार आहे .
मालवण, कणकवली नगरपंचायतीच्या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले असून कणकवलीमध्ये भाजप विरुद्ध सर्व राजकीय पक्ष एकत्र आल्याचे पाहायला मिळत आहे. सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार असून एक ते दोन तासात चित्र स्पष्ट होईल.
Summery
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक नगरपंचायत तर तीन नगरपरिषदेसाठी आज मतमोजणी होणार आहे
मालवण, कणकवली नगरपंचायतीच्या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष
कणकवलीमध्ये भाजप विरुद्ध सर्व राजकीय पक्ष एकत्र