मुंबईत कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय का अशी भीती सध्या व्यक्त होत आहे. मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एक मयत रुग्ण कोरोनाबाधित असल्याचं समोर आलं आहे. केईएम रुग्णालयात रविवारी सकाळी ५९ वर्षीय एका महिलेचा तर १३ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला होता. दरम्यान, ५९ वर्ष वृद्ध महिलेची कोरोना चाचणी पॉजिटिव असल्याचा रिपोर्ट समोर आलाय. मात्र हे मृत्यू कोरोनामुळे झाले नसून त्यांना असलेल्या इतर व्याधीमुळे झाल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेंनी आपली प्रतिक्रिया दिली आहेत.
"बाहेरच्या देशात कोरोनाच्या रुग्णाची संख्या वाढत असल्याचे दिसत आहे. हा रोग आपल्या देशात डोकवर काढू नये. यासाठी सरकारने लवकरात लवकर उपाययोजना केल्या पाहिजेत. त्यामुळे नागरिकांच्या मनात भीती निर्माण होणार नाही. सरकारने नागरिकांशी बोलायला पाहिजे. मागच्यावेळी उद्धव ठाकरे वेळोवेळी नागरिकांसोबत बोलत होते. रुग्णाची संख्या लपवण्याचे काम काही राज्यातल्या सत्ताधाऱ्यांनी केलं. ती राज्य कोणाची आहेत, हे सर्वांना माहिती आहे."