महाराष्ट्र

क्रिकेटपटू रोहित शर्मा झाला अलिबागकर, 4 एकर जागा केली खरेदी

Published by : Lokshahi News

भारत गोरेगावकर, रायगड | क्रिकेटपटू रोहित शर्मा आता अलिबागकर झालाय. अलिबागजवळ त्याने 4 एकर जागा खरेदी केली आहे. या जागेचा व्यवहार 9 कोटी रुपयांना झाला असल्याची सूत्रांची माहिती आहे.

क्रिकेटपटू रोहित शर्मा याने मांडवा बंदरापासून जवळच सारळ इथं 4 एकर जागा खरेदी केली आहे. या जागेचा व्यवहार 9 कोटी रुपयांना झाला असल्याची सूत्रांची माहिती आहे.आज या जागेचे खरेदीखत रजिस्टर करण्यासाठी रोहित शर्मा हा आपली पत्नी रितिका हिच्यासह अलिबाग येथील दुय्यम निबंधक कार्यालयात आला होता. रोहित शर्मा हा रायगड जिल्ह्यात रजिस्टर इनोव्हा कारमधून आला होता त्यामुळे त्याच्या आगमनाची कुणकुण फारशी कुणाला लागली नाही. तरीही रोहित शर्मा आल्याचे कळताच अनेकांनी त्याच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली होती.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रोहित शर्मा पाठोपाठ ऋषभ पंत आणि हार्दिक पंड्या हेदेखील लवकरच अलिबागकर होणार आहेत. अलिबाग तालुक्यात ते जागा आणि रो हाऊस खरेदी करणार असल्याचे समजते.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा