(Dhule) धुळ्याच्या शासकीय विश्रामगृहात विधिमंडळातील अंदाज समितीमधील आमदारांना देण्यासाठी पाच कोटी रुपये आणल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे नेते आणि माजी आमदार अनिल गोटे यांनी केला होता.
या विश्रामगृहातील क्रमांक 102 ही खोली जिल्हाधिकारी किंवा पोलीस अधीक्षक यांच्या हजेरीत उघडण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली होती. त्यानंतर अधिकाऱ्यांनी खोलीत घेतलेल्या झडतीत तब्बल 1कोटी 84 लाख 84 हजार 200 रुपयांची रोकड आढळल्याची माहिती मिळत आहे.
या रोकड रकमेची मोजणी आज पहाटे चार वाजता संपल्याची माहिती मिळत असून या प्रकरणी आता धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या घटनेमुळे धुळ्यात एकच खळबळ उडाली आहे.