महाराष्ट्र

मुंबईत १५ जानेवारीपर्यंत जमावबंदी; ‘या’वेळेत चौपाटी, बागा, सार्वजनिक ठिकाणी जाण्यास बंदी

Published by : Lokshahi News

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. संध्याकाळी 5 ते पहाटे 5 वाजेपर्यंत चौपाटी, सार्वजनिक स्थळ, गार्डन, रिकामी मैदान समुद्रकिनारी जाण्यास मुंबई पोलिसांकडून बंदी घालण्यात आली आहे. सुरूवातीला पोलिसांनी 7 जानेवारी 2022 पर्यंत जमावबंदी लागू केली होती आता कलम 144 (section 144 ) चा कालावधी पोलिसांनी 15 जानेवारी पर्यंत वाढवला आहे. याबाबतीत सह पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी माहिती दिली आहे.

विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितले, ' 31 डिसेंबरच्या अनुशंगाने नागरिकांनी पँनिक होऊ नये. मुंबईत चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. घातपाताच्या अनुशंगाने सर्व मेजर काळजी घेण्यात आलेली आहे. कोरोनाच्या नव्या नियमावलीनुसार महापालिकेच्या पथकासोबत पोलिसही कारवाईत सहभागी राहणार आहेत. याबाबत सर्व पोलिस पथक, पोलिस ठाण्याना सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.' नागरिकांनी घरी राहून यंदाचा 31 डिसेंबर साजरा करावा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

मुंबईत काल, गुरुवारी ३ हजार ६७१ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून एकही रुग्णाच्या मृत्यू नोंद झाली नाही. तसेच ३७१ बरे होऊन घरी गेले आहेत. मुंबईतील आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या ७ कोटी ७९ लाख ४७९वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १६ हजार ३७५ जणांचा मृत्यू झाला असून ७ लाख ४९ हजार १५९ रुग्ण रिकव्हर झाले आहे. सध्या मुंबईत ११ हजार ३६० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. एकाबाजूला मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या दुप्पटीने वाढत असून दुसऱ्याबाजूला ओमिक्रॉनची संख्या झपाट्याने वाढत आहे. राज्यात काल १९७ ओमिक्रॉनबाधित नोंद झाली. त्यापैकी १९० रुग्ण हे एकट्या मुंबईतले होते.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा

Gujrat Rain Update : गुजरातमध्ये समुद्र खवळला; तीन बोटी बुडाल्या

Chhatrapati Sambhajinagar : "काळजी घ्या" मृत्यूपूर्वी वडिलांना फोन! सिलेंडरमध्ये खुपसवली कात्री अन् स्फोटादरम्यान CA विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू

Monorail : मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार; MMRDAने घेतला महत्त्वाचा निर्णय