Mumbai Curfew | Mumbai Police team lokshahi
महाराष्ट्र

मुंबईत 10 जुलैपर्यंत जमावबंदीचे आदेश

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सेना भवनात दाखल

Published by : Shubham Tate

Mumbai Curfew : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सेना भवनात दाखल झाले आहेत. त्यावेळी उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा दिल्या. काही मिनिटापूर्वी मुख्यमंत्री पोहोचले आहेत. शिवसेनेशी (Shiv Sena) बेईमानी करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, कार्यकारिणीच्या बैठकीत असा ठराव मंजूर होणार आहे. तसेच मुंबईत 10 जुलैपर्यंत जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. राजकीय पक्षांच्या कार्यालयाचा बंदोबस्त देखील वाढवला आहे. (Curfew order in Mumbai till July 10)

दरम्यान, दुसरीकडे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे शिवसेनेतून (Shivsena) आमदारांची इनकमिंग सुरुच असल्याने ठाकरे सरकार अल्पमतात आले आहे. अशात एकनाथ शिंदे यांनी सत्ता स्थापनेच्या दिशेने हालचाली सुरु केल्या आहेत. शिवसेना बाळासाहेब ठाकरे (Shivsena Balasaheb Thackeray) असे नाव एकनाथ शिंदे यांच्या गटाचे ठेवले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या नावाची अधिकृत घोषणा संध्याकाळी होण्याची शक्यता आहे.

गुवाहाटीतील बंडखोर आमदारांची आज बैठक होणार असून पुढील रणनितीवर चर्चा होण्याची शक्यता आहे. याच बैठकीत शिवसेना बाळासाहेब ठाकरे या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. तसेच, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची 4 वाजता पत्रकार परिषद होणार आहे. यावेळी शिंदे गट नावाची अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे. यामुळे लवकरच एकनाथ शिंदे राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा करण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर, भाजपही आता सक्रिय झाली असून भारतीय जनता पार्टीची कोर कमिटीची बैठक सकाळी 11 वाजता होणार आहे. यामुळे महाविकास आघाडी सरकार आता लवकरच कोसळणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Sanjay Raut : मुंबईत आज साजरा होणार ‘मराठी विजय दिन’; संजय राऊतांनी सांगितली कार्यक्रमाची रुपरेषा

Latest Marathi News Update live : विजयी मेळाव्याला मराठी कलाकारांचीही हजेरी

Sudhir Mungantiwar : 'हिंदी शिकणं अवमान, पण इंग्रजी शिकणं अभिमान, असं कसं?'; सुधीर मुनगंटीवार यांचा टोला

Sandeep Deshpande : 'आवाज मराठीचा!', विजयी मेळाव्यासाठी संदीप देशपांडेंचा खास टी-शर्ट; मराठीची मुळाक्षरेही दिसताहेत उठून