महाराष्ट्र

चेंबूरमध्ये सिलेंडरचा भीषण स्फोट; 4-5 घरे कोसळली

मुंबईच्या चेंबूरमधून धक्कादायक घटना समोर येत आहे. गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाला असून यामध्ये 4 जण गंभीर जखमी झाले आहेत.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : मुंबईच्या चेंबूरमधून धक्कादायक घटना समोर येत आहे. गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाला असून यामध्ये 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. चेंबूर परिसरातील गोल्फ क्लबजवळ ही घटना घडली आहे.

माहितीनुसार, चेंबूरमध्ये गोल्फ क्लबजवळील जुन्या बॅरेकमध्ये गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाला आहे. हा स्फोट इतका भीषण होता की सिलेंडरच्या स्फोटाने आजूबाजूची 4 ते 5 घरे कोसळली आहेत. या स्फोटात 4 जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर, 11 जणांची अग्निशमन दलाकडून नागरिकांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. या स्फोटामुळे परिसरात गोंधळ उडाला होता.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Onion Juice Benefits : कांद्याच्या रसाचे 'हे' आहेत चमत्कारिक फायदे

Reason for Gandhi photo on notes : भारतीय चलनाच्या नोटांवर महात्मा गांधींचा फोटो का ? जाणून घ्या

Pune Crime : धक्कादायक! पुण्यात पैशांसाठी आई-वडिलांनी पोटच्या लेकीला विकलं

Kangana Ranaut : भाषावादामध्ये कंगना रनौतची उडी ; म्हणाली, "माणसांना दूर करणाऱ्या गोष्टींपासून दूर..."