महाराष्ट्र

पुणे विमानतळाच्या भिंतीनजीक स्फोट; एकामागोमाग एक १० सिलेंडर फुटले

पुणे लोहगाव विमानतळाच्या भिंतीनजीक स्फोट झाल्याची घटना घडली आहे. एकामागोमाग एक तब्बल १० सिलेंडरचे स्फोट झाल्याने परिसर हादरला.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

पुणे : पुणे लोहगाव विमानतळाच्या भिंतीनजीक स्फोट झाल्याची घटना घडली आहे. एकामागोमाग एक तब्बल १० सिलेंडरचे स्फोट झाल्याने परिसर हादरला असून याठिकाणी आणखीन ५० सिलेंडर असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेची माहिती मिळताच दलाच्या गाड्या घटनास्थळावर दाखल झाल्या आहे.

माहितीनुसार, पुण्यातील लोहगाव विमानतळ भिंतीलगत असलेल्या होरिजन डेव्हलपर यांची कन्स्ट्रक्शन साइटच्या मागील बाजूस असलेल्या दीपक देवकर यांची मोकळी जागा आहे. या जागेत पत्राच्या शेडमध्ये अनधिकृतपणे गॅस सिलेंडरचा साठा होता. त्या ठिकाणी आज दुपारी काही सिलेंडरचा स्फोट झाला होता. यामध्ये 10 सिलेंडरचे स्फोट झाल्याने परिसरात घबराट पसरली होती. अग्निमशन दलाकडून तातडीनं यावर नियंत्रण मिळवण्यात आले. सदर घटनेमध्ये कोणीही जखमी नाही तसेच कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पणं, अनधिकृतपणे सिलेंडरचा साठा केल्याचं समोर आले आहे, अशी माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा