Eknath Shinde Team Lokshahi
महाराष्ट्र

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी

या आधी देखील नक्षलवाद्यांकडून जीवे मारण्याची शिंदेंना आली होती धमकी

Published by : Sagar Pradhan

राज्यात खळबळ उडवून देणारी बातमी समोर येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. आत्मघाती स्फोट घडवून जीवे मारण्याचा प्रयत्न केला जाणार होता अशी गुप्तचर विभागाला माहिती प्राप्त झाली होती. चिंतेची बाब म्हणजे याआधी महिनाभरापूर्वी देखील माओवाद्यांकडून मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी आली होती.

सरकारने पीएफआय या संघटनेवर बंदी घातली असून त्याचा या प्रकरणाचा काही संबंध आहे का याचा तपास पोलिस करत आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बंदोबस्वत वाढवण्यात आला आहे. सोबतच त्यांच्या कुटुंबीयांची सुरक्षा व्यवस्था देखील वाढवण्यात आली आहे. 

५ तारखेला शिंदे गटाचा बीकेसी मैदानात दसरा मेळावा पार पडणार आहे. त्या दृष्टीने आता पोलिसांनी सुरक्षेची तयारी केली असून दसरा मेळाव्याच्या स्टेजवर काही मोजकेच लोक असतील अशी माहिती माहिती समोर येत आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा