कर्नाटकमधील बेंगळुरूत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याचा प्रकार घडला. या घटनेमुळं शिवप्रेमींमध्ये प्रचंड नाराजी आहे. या घटनेचा सर्वत्र निषेध करण्यात येत आहे.
या घटनेवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विटद्वारे प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. भाजपचे राज्य असलेल्या कर्नाटकातील बेंगळुरूत छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची अशा प्रकारे विटंबना होते, असं म्हणत या घटनेचा त्यांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला.
दोन दिवस आधी पंतप्रधान मोदी काशी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याचा जयजयकार करतात आणि भाजपचे राज्य असलेल्या कर्नाटकात छत्रपतींची अशी विटंबना होते.. हे चित्र बेंगळुरू येथील आहे.. धिक्कार!धिक्कार! उठ मराठ्या ऊठ!! असे म्हणत संजय राऊत यांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला.