महाराष्ट्र

Ghaziabad: लहान मुलांचे लैंगिक शोषणाचे धडे देणाऱ्या विकृत तरुणीला गाझियाबादमधून अटक

उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये एक लाजिरवाणी घटना समोर आली आहे.

Published by : Dhanshree Shintre

उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये एक लाजिरवाणी घटना समोर आली आहे. एका महिला युट्युबर मुलांच्या लैंगिक शोषणाचे ऑनलाईन धडे देत होती, त्यानंतर एकच गोंधळ उडाला. लोकांनी तो पाहिल्यानंतर त्यांनी आशयावर आक्षेप घेतला. हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी तक्रार नोंदवून कारवाई केली. या महिलेच्या चॅनलवर आक्षेपार्ह मजकुराचे व्हिडिओ आहेत.

शिखा मैत्रेय असं विकृत तरुणीचं नाव आहे. हे प्रकरण राष्ट्रीय बाल संरक्षण आयोग आणि राष्ट्रीय महिला आयोगापर्यंत पोहोचल्यानंतर, गाझियाबाद पोलिसांनी 12 जूनच्या संध्याकाळी उशिरा यूट्यूबर शिखा मैत्रेय उर्फ ​​कुंवरी बेगम विरुद्ध एफआयआर नोंदवून तपास सुरू केला. मात्र, गुन्हा दाखल झाल्यानंतर युट्युब चॅनलवरुन आक्षेपार्ह मजकूर असलेले काही व्हिडीओ काढून टाकण्यात आले.

पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत असे म्हटले आहे की, आरोपी तरुणीने तिचे सर्व सोशल मीडिया प्रोफाइल डिलीट केले आहेत. तक्रारीत असे म्हटले आहे की ती गाझियाबादची रहिवासी आहे आणि एनईएफटी दिल्लीमधून 2021-2022 बॅचची पासआउट आहे. ती सध्या दिल्लीतील एका संस्थेत काम करत आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा