थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली बातमी Scroll करा...
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटप्रकरणात तपास यंत्रणांना मोठे धागेदोरे मिळाले आहेत. या स्फोटाच्या आदल्या दिवशीच हरियाण्यातील फरीदाबाद येथून अटक करण्यात आलेला संशयित डॉक्टर मुजम्मिलच्या साहित्यातून काही नवे खुलासे झाले आहेत. त्याच्या खोलीतून मिळालेल्या डायरी आणि वहीतून, हे दहशतवादी मॉड्यूल बराच दिवसांपासून भारतात मोठी कारवाई करण्याच्या तयारीत होते, असे स्पष्ट होते.या डायरीतून मिळालेल्या माहितीवरून, असू दिसून येते की, हे एक आखलेले कटकारस्थान होते. डॉ. मुजम्मिलच्या या डायरीतील नोंदीच्या सहाय्याने दिल्ली स्फोटाशी संबंधित अनेक प्रश्नांची उत्तरे मिळण्याची शक्यता आहे.
थोडक्यात
दिल्लीतील स्फोट प्रकरण
मुजम्मिलच्या साहित्यातून नवे खुलासे
डॉ. उमरच्या, डॉ. मुजम्मिलच्या रूममधून मिळाल्या डायऱ्या
8 ते 12 नोव्हेंबरचा डायरीत उल्लेख