थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Delivery Boy ) डिलिव्हरी बॉय आता संपावर जाणार आहेत. 31 डिसेंबरला डिलिव्हरी बॉय संपावर जाणार असून विविध मागण्यांसाठी त्यांनी देशव्यापी संप पुकारला आहे. कामाची खालावलेली स्थिती, कमी होत जाणारी कमाई आणि सामाजिक सुरक्षेचा अभाव या प्रमुख मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे.
तेलंगणा गिग अँड प्लॅटफॉर्म वर्कर्स युनियन आणि इंडियन फेडरेशन ऑफ ॲपबेस्ड ट्रान्सपोर्ट वर्कर्स यांनी नुकतेच संयुक्त निवेदन जारी करत 31 डिसेंबरला देशव्यापी संपाची हाक दिली आहे. या संपात देशभरातील मेट्रो शहरांसह प्रमुख शहरांमधील गिग वर्कर्स सहभागी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
या संपात मुंबईत 10 हजार जण सहभागी होणार आहेत, अशी माहिती अॅप आधारित इंडियन फेडरेशन ऑफ ट्रान्सपोर्ट वर्कर्सचे अध्यक्ष प्रशांत सावर्डेकर यांनी सांगितले.
Summery
डिलिव्हरी बॉय 31 डिसेंबरला संपावर
विविध मागण्यांसाठी पुकारला देशव्यापी संप
संपात मुंबईत १० हजार जण सहभागी होणार असल्याची माहिती