महाराष्ट्र

”मुख्यमंत्री सहाय्यता निधीला पैसे देऊन माझा वाढदिवस साजरा करा”

Published by : Lokshahi News

राज्यातील कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला असून कार्यकर्त्यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीला पैसे देऊन वाढदिवस साजरा करण्याचे आवाहन केले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा येत्या गुरुवार दिनांक २२ जुलै रोजी वाढदिवस आहे. यानिमित्त कार्यकर्ते, हितचिंतक, नागरिकांची होणारी गर्दी पाहता कोरोनाचा धोका लक्षात घेता उपमुख्यमंत्र्यांनी त्यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.

आपण वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला असून कार्यकर्ते व हितचिंतकांनीही गर्दी जमवणारे कोणतेही कार्यक्रम आयोजित न करता त्यासाठी खर्च होणारा निधी मुख्यमंत्री सहायता निधीसारख्या कोविडविरोधी लढ्यासाठी द्यावा. मान्यताप्राप्त यंत्रणांच्या सहकार्याने, कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करुन रक्तदान शिबिरांसारखे लोकोपयोगी कार्यक्रम आयोजित करावेत, असे आवाहन केले आहे.

सर्वांनी कोरोनाप्रतिबंधक नियमांचे पालन करुन महाराष्ट्राला कॉरोनामुक्त करण्याच्या लढाईत योगदान द्यावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात गेल्यावर कसा अनुभव येतो? लोकशाहीशी बोलताना आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...

"देशभक्त शब्दावर आक्षेप घेणारे फडणवीस देशद्रोही आहेत"; उद्धव ठाकरेंचा उपमुख्यमंत्र्यांवर पलटवार

Shivsena UBT : ठाकरे गट -भाजप कार्यकर्ते भिडले, कोटे समर्थकांनी पैसे वाटल्याचा ठाकरे गटाचा आरोप

"मोदींनी काँग्रेसचा कलंक संपवून अयोध्येत राम मंदिर उभारलं"; उत्तर प्रदेशचे CM योगी आदित्यनाथ यांचा विरोधकांवर हल्लाबोल

Manoj Jarange Patil : 4 तारखेला उपोषण करणार म्हणजे करणार