DEPUTY CM PRAISES MAHAYUTI WORKERS | SHIV SENA-BJP COORDINATION, STRIKE RATE TO RISE 
महाराष्ट्र

Eknath Shinde: “महायुतीचा स्ट्राईक रेट पुढेही वाढतच जाणार” उपमुख्यमंत्र्यांचा विश्वास; कार्यकर्त्यांचे कौतुक, भाजपाचंही अभिनंदन

Municipal Elections 2025: उपमुख्यमंत्र्यांनी महायुतीच्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीतील कार्यकर्त्यांचे कौतुक केले.

Published by : Dhanshree Shintre

राज्यातील नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर उपमुख्यमंत्री आज पत्रकार परिषदेत बोलले . यामध्ये त्यांनी सर्वप्रथम महायुतीतील कार्यकर्त्यांचे मनापासून अभिनंदन करत या निवडणुकीतील मेहनतीचं विशेष कौतुक केलं. “या निवडणुकीत आमच्या कार्यकर्त्यांनी अक्षरशः झपाटल्यासारखं काम केलं. शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्ह घराघरात पोहोचवण्याचं काम आमच्या आमदारांनी, खासदारांनी, मंत्र्यांनी आणि नगरसेवकांनी एकत्रितपणे केलं आहे,” असं स्पष्ट करत उपमुख्यमंत्र्यांनी संघटनात्मक ताकदीचा उल्लेख केला.

भाजप ‘नंबर वन’ ठरला; फडणवीसांचंही अभिनंदन

या भाषणात उपमुख्यमंत्र्यांनी महायुतीतील सहकारी पक्ष भाजपाचंही खुलेपणाने अभिनंदन केलं. “या निवडणुकीत भाजप राज्यात नंबर वन पक्ष ठरला आहे. यासाठी मी देवेंद्र फडणवीस यांचेही मनापासून अभिनंदन करतो,” असं सांगत त्यांनी महायुतीतील समन्वय अधोरेखित केला.

‘शिवसेना दिलेला शब्द पाळते’ सामान्य माणसांच्या प्रश्नांवर भर

शिवसेनेच्या कार्यपद्धतीवर बोलताना उपमुख्यमंत्री म्हणाले की, “शिवसेना ही केवळ निवडणुकांपुरती मर्यादित नसून, दिलेला शब्द पाळणारी आणि सामान्य माणसांच्या अडचणी सोडवणारी चळवळ आहे.” याच भूमिकेमुळे लोकांचा विश्वास शिवसेनेवर कायम असल्याचं त्यांनी नमूद केलं.

लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्यातही ‘स्ट्राईक रेट’ मजबूत

शिवसेनेच्या निवडणूक कामगिरीकडे लक्ष वेधताना उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेचा स्ट्राईक रेट उल्लेखनीय राहिला आहे. “हाच स्ट्राईक रेट नगरपरिषद, नगरपंचायत आणि महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्येही दिसून आला आहे. त्यामुळे येणाऱ्या महानगरपालिकाm निवडणुकांमध्ये महायुतीचा विजयाचा आलेख आणखी वर जाणार,” असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

‘घरी बसलेल्यांना जनतेने घरी बसवलं’ सूचक टोला "

या निवडणुकीत प्रत्यक्ष मैदानात न उतरता केवळ घरी बसून टीका करणाऱ्यांवरही उपमुख्यमंत्र्यांनी नाव न घेता टीका केली. “जे लोक या निवडणुकीत घरी बसले होते, ज्यांनी कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडलं होतं, अशा लोकांना नागरिकांनी मतदानातून घरी बसवलं आहे,” असं म्हणत त्यांनी जनतेचा कौल स्पष्ट असल्याचं अधोरेखित केलं.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा