आज माहाराष्ट्राच्या विधानसभेत उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प 2022-23 ह्या आर्थिक वर्षासाठी सादर केला गेला. ह्या अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा केल्या गेल्या. अनेक क्षेत्रांमध्ये मोठे निर्णय घेण्यात आले. ह्या अर्थसंकल्पानंतर सर्व राजकीय पक्षांतून संमिश्र प्रतिक्रीया येत आहेत.
दरम्यान, माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज सादर झालेल्या अर्थसंकल्पावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी तिखट शब्दांत सरकारवर व आजच्या अर्थसंकल्पावर टीका केली आहे.
काय म्हणाले फडणवीस?
"कळसुत्री सरकारनं मांडलेला अर्थसंकल्प सर्वसामान्यांच्या तोंडाला पानं पुसणारा आहे. सरकारनं महाराष्ट्राच्या विकासाला पंततत्वात विलीन केलं आहे." अशा शब्दात फडणवीसांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.