थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Nagpur) महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहे.सभांचा धडाका सुरू असल्याचे पाहायला मिळत असून आज संध्याकाळी प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. यामुळे जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी नेत्यांच्या सभांचे आयोजन करण्यात येत आहे.
याच पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची नागपूरमध्ये बाईक रॅली निघाल्याचे पाहायला मिळत आहे. भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी भव्य प्रचार रॅली निघाली आहे. नागपूरात भाजपचं शक्तीप्रदर्शन पाहायला मिळत आहे.
येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.
Summary
आज संध्याकाळी प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत
नागपुरात फडणवीसांची बाईक रॅली
नागपुरात भाजपचं शक्तीप्रदर्शन