मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १५ दिवसांच्या लॉकडाऊसाठी पॅकेज जाहीर केल्यानंतर आता विरोधकांनी त्यांना लक्ष्य केलं आहे. विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या या घोषणांवर टीका केली आहे.
मुख्यमंत्र्यांनी केवळ काहीच घटकांचा विचार केला असून यामध्ये बारा बलुतेदार, छोटे व्यवसायिक, केश कर्तनालय, फुलवाले यांच्यासाठी कोणतीही योजन आणली नसल्याचा आरोप फडणवीसांनी केला आहे.