महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस ‘शिवतीर्थ’वर राज ठाकरेंच्या भेटीला जाणार, कारण...

Published by : Shweta Chavan-Zagade

गेल्या काही काळापासून मनसे (MNS) आणि भाजपमधील (BJP) जवळीक वाढत आहे. नुकत्याच झालेल्या राज्यसभा, विधानपरिष, विधानसभा अध्यक्षपद निवडणूक आणि विश्वासदर्शक ठरावावेळी मनसेच्या आमदाराने भाजपला साथ दिली होती. त्यासाठी देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी विधानसभेत राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे जाहीर आभार मानले होते. तसेच आपण लवकर त्यांची भेट घेऊन आभार मानू, असेही म्हटले होते. त्यानुसार आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या भेटीला जाणार आहेत. देवेंद्र फडणवीस आज दुपारी दोन वाजता दादर येथील राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी जाणार आहेत. आता या भेटीत काही महत्त्वाची चर्चा होऊन राजकीय नाट्याचा पुढचा अंक पाहायला मिळणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

राज ठाकरे यांच्या पायावर शस्त्रक्रिया झाल्यामुळे त्यांना डॉक्टरांनी साधारण तीन महिने सक्तीची विश्रांती घेण्यास सांगितले होते. राज ठाकरे लवकरच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना ऑनलाईन मार्गदर्शन करणार आहेत. एकनाथ शिंदे (Eknath Shinde ) यांनीही बंड केल्यानंतर राज ठाकरे यांच्याशी फोनवरुन संवाद साधला होता.

तर मनसेच्या एकमेव आमदाराने विधानसभा अध्यक्षपद निवडणूक आणि विश्वासदर्शक ठरावावेळी शिंदे-फडणवीस सरकारच्या बाजूने मतदान केले होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिवसेना आणि मनसे हे नेहमीच परस्परांचे कट्टर प्रतिस्पर्धी राहिले आहेत. मात्र, आता शिवसेना खिळखिळी झाल्यानंतर आगामी निवडणुकांमध्ये मनसे याचा फायदा घेऊन आपला विस्तार करणार का, हे पाहावे लागेल.

IPL 2024 : रोहित शर्मा मुंबई इंडियन्समधून बाहेर पडणार? MI च्या मुख्य प्रशिक्षकाला हिटमॅनने स्पष्टच सांगितलं, म्हणाला...

"उबाठा पक्ष काँग्रेसमध्ये आधीच विलीन झालाय"; उद्योगमंत्री उदय सामंत यांचा मोठा दावा

टी-२० वर्ल्डकपआधी कर्णधार रोहित शर्माचं फॉर्मबाबत मोठं विधानं; म्हणाला,"फलंदाज म्हणून मला..."

"मुंबई आणि महाराष्ट्राचं वैभव लुटणाऱ्यांना आम्हाला गाडायचंय"; उद्धव ठाकरेंचा PM मोदी आणि अमित शहांवर निशाणा

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात गेल्यावर कसा अनुभव येतो? लोकशाहीशी बोलताना आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...