महाराष्ट्र

धनंजय मुंडेंनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला, पंकजा मुंडेंचा घणाघात!

Published by : Lokshahi News

मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला, अशी टीका करणाऱ्या धनंजय मुंडे यांनीच बाबासाहेबांनी दिलेल्या अ‍ॅट्रॉसिटीचा गैरवापर केला, खोटी अ‍ॅट्रॉसिटी लावल्याचा आरोप भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी दिला. केज नगरपंचायत इमारतीच्या लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीका केली.

केज नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारावेळी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सूरू आहेत. पंकजा मुंडे यांनी सर्वोत्कृष्ट मंत्र्यांच्या यादीत धनंजय मुंडे यांचं मंत्रीपद 32 व्या क्रमांकावर असल्याची टीका केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देताना धनंजय मुंडे यांनी 'पंकजा मुंडे यांनी माझी औकात काढली. माझ्या खात्याचा म्हणजेच सामाजिक न्याय विभागाचा आणि पर्यायानं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले होते.

धनंजय मुंडे यांच्या उपरोक्त टीकेला उत्तर देतानाच पंकजा मुंडे यांनी, तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला, असे आरोप झाले. मी 32 नंबरचं मंत्रीपद म्हणलं यात बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान काय? बाबासाहेबांचा अपमान तुम्ही आणि तुमचे कार्यकर्ते करतात. खोट्या अॅट्रॉसिट्या करतात. कायदा वापरतात. पोलिसांना घरच्या कामासाठी ठेवल्यासारखे वापरून घेता, तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेचा अपमान करताय. बाबासाहेब आंबेडकरांनी गरीबाला वाचवण्यासाठी जे अ‍ॅट्रॉसिटीची कवच कुंडलं दिली आहेत, त्याचा गैरवापर जर इथुन पुढे बीड जिल्ह्यात कुणी केला तर तो खपवून घेतला जाणार नाही' असा इशारा पंकजा मुंडे यांनी केला.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा