Dhananjay Munde Team Lokshahi
महाराष्ट्र

Video: रक्ताच्या थारोळ्यात पडलेला तरूण, धनंजय मुंडेंनी ताफा थांबवत...

धनंजय मुंडे यांनी त्या तरुणाचा हात पकडून तो शुद्धीत असल्याची खात्री केली, आपले नाव महेश असल्याचे सांगत त्या तरुणाने तो पांगरी (ता. परळी) इथला असल्याचे सांगितले.

Published by : left

राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा ताफा रस्त्यावरून जात असताना एक दुचाकीस्वार रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. यावेळी तत्काळ ताफा थांबवत धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी त्याला मदत मिळवून दिली.

बीड वरून परळी कडे जात असताना सिरसाळा ते पांगरी दरम्यान एक तरुण दुचाकीस्वार अपघात ग्रस्त होऊन रस्त्यावर अक्षरश: रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता, हे दृश्य पाहताच धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी आपला ताफा तात्काळ थांबवून अपघात ग्रस्त तरुणाच्या दिशेने धाव घेतली. धनंजय मुंडे यांनी त्या तरुणाचा हात पकडून तो शुद्धीत असल्याची खात्री केली, आपले नाव महेश असल्याचे सांगत त्या तरुणाने तो पांगरी (ता. परळी) इथला असल्याचे सांगितले.

त्या तरुणाच्या डोक्याला गंभीर जखम झालेली होती ते पाहून धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी तात्काळ आपल्या स्वीय सहाय्यकांना, पोलीस व रुग्णवाहिका बोलावण्यासाठी फोन लावायला लावला, धनंजय मुंडे यांनी स्वतः बोलल्यानंतर अगदी दोनच मिनिटात रुग्णवाहिका घटनास्थळी हजर झाली; धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी सदर तरुणाला अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्याचा सूचना दिल्या तसेच रुग्णालय प्रशासनाला देखील याबाबत दक्षता घेण्याबाबत धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी सूचना दिल्या.

अपघातग्रस्ताच्या कुटुंबियांनाही केली मदत

सदर तरुणास अंबाजोगाई कडे रवाना केल्यानंतर घटनेची माहिती अपघात ग्रस्त तरुणाच्या कुटुंबास मिळाली, त्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली असता, धनंजय मुंडे यांची रस्त्यात भेट झाली, तेव्हा ताई तुम्ही काळजी करू नका, सावकाश अंबाजोगाईला जा, तो बरा आहे, शुद्धीवर आहे, बोलतोय, रुग्णालयात देखील मी बोललो आहे, अशी माहिती देऊन त्यांना धीर दिला, तसेच त्यांनाही अंबाजोगाईला जाण्यासाठी वाहनाची व्यवस्था करून दिली.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Shiv Sena UBT Dasara Melava | Uddhav Thackeray : कर्जमाफी ते राज-उद्धव युतीवरुन उद्धव ठाकरेंनी सरकारला ठणकावलं

Eknath Shinde On Uddhav Thackeray : "तुमचा मेळावा पाकिस्तानमध्ये...." सुरतच्या मेळाव्याबाबत एकनाथ शिंदेचं प्रत्युत्तर

Eknath Shinde Dasara Melava Speech : लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेचं मोठं वक्तव्य म्हणाले की...

Eknath Shinde On Uddhav Thackeray : "हे पक्षप्रमुख नाही हे ...." एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर जोरदार टीकास्त्र