थोडक्यात
राज्याच्या पोलीस महासंचालक पदासाठी सात जणांची यादी पाठवल्याची माहिती
यादी मंजुरीसाठी यूपीएससी कडे पाठवल्याची माहिती
पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला 31 डिसेंबर रोजी होणार निवृत्त
(Rashmi Shukla) पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला 31 डिसेंबर रोजी निवृत्त होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्याच्या पोलीस महासंचालक पदासाठी 7 जणांची यादी मंजुरीसाठी यूपीएससीकडे पाठवण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
एन आय ए चे प्रमुख सदानंद दातेसह 7 जणांची यादी पाठवल्याची माहिती मिळत आहे. या सर्व प्रक्रियेनंतर राज्य सरकारकडून त्यापैकी एकाची महाराष्ट्राचे पुढील पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात येईल. त्यामुळे आता रश्मी शुक्ला यांच्यानंतर महाराष्ट्राचे पुढील पोलीस महासंचालक कोण होणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.