थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Mahesh Manjrekar) नाशिकमध्ये 2027 साली होणाऱ्या कुंभमेळ्याची मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू आहे. या कुंभमेळ्यासाठी देशभरातून अनेक साधू-महंत येत असतात त्यांच्या निवासासाठी तपोवनामध्ये साधुग्राम नगरी वसविली जाते. या कुंभमेळ्यात साधू-महंतांना राहण्यासाठी तपोवन परिसरात 1150 एकरांवर साधूग्राम उभारण्यात येणार आहे.
त्यासाठी 1800 झाडांची कत्तल केली जाणार आहे.यामुळे परिसरातील नागरिक आणि पर्यावरणप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या वृक्षतोडी विरोधात नाशिककर, पर्यावरणप्रेमींसह सेलिब्रिटी देखील याला विरोध करताना पाहायला मिळत आहे. अनेक कलाकार, राजकारणी यावर व्यक्त होताना पाहायला मिळत आहेत.
याच पार्श्वभूमीवर आता दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महेश मांजरेकर म्हणाले की, कोणत्याही कामासाठी झाडं तोडू नये, गरज असेल तर पर्यायी मार्ग निवडावा पण झाडं तोडू नये. असे महेश मांजरेकर म्हणाले.
Summery
तपोवनातील वृक्षतोडीवर महेश मांजरेकरांची प्रतिक्रिया
'कोणत्याही कामासाठी झाड तोडू नये'
'गरज असल्यास पर्यायी मार्ग निवडावा'