मुंबई : बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मीरा रोडच्या जेपी इन्फ्रा सोसायटी मधील एका रहिवाशाने आपल्या घरी दोन बकऱ्या आणल्या. याला संपूर्ण सोसायटीतील रहिवाशांनी संपूर्ण रात्रभर विरोध केला आहे. तर, जय श्रीरामच्या घोषणा देत हनुमान चालिसाचे पठण केल्याचेही समजते आहे. याबाबत रहिवाशांना शांत करण्यासाठी मीरा-भाईंदर पोलीस आयुक्तालयातील पोलीसही हजर झाले होते.