(Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohala ) आषाढी एकादशीला भक्तांना ओढ लागते ती पंढरीच्या पांडुरंग भेटीची. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज 19 जूनला प्रस्थान करणार असून 5 जुलै पालखी पंढरपुरात दाखल होणार आहे.
आज गुरुवार आल्यामुळे रात्री 8 वाजता माऊलींच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे. हरिनामाचा जयघोष करत दरवर्षी लाखो भाविक पंढरपूर वारीमध्ये सहभागी होतात. राज्याच्या कानाकोपऱ्यातून पंढरीच्या वारीसाठी हजारांहून अधिक दिंड्या येतात. यंदा 6 जुलैला आषाढी एकादशी आली असून त्यासाठी वारकऱ्यांची पायी वारी सुरू झाली आहे.