महाराष्ट्र

पुण्यात NIAची मोठी कारवाई; तरुणांना ISIS मध्ये भरती करणाऱ्या डॉक्टरला अटक

इसिस प्रकरणातील ही पाचवी अटक असून मुंबई, ठाणे आणि पुणे येथून एनआयएने चार जणांना अटक केली होती.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

चंद्रशेखर भांगे | पुणे : इसिस प्रकरणी एनआयएने पुण्यात मोठी कारवाई केली आहे. इसिस दहशतवादी संघटनेच्या हिंसक कारवायांना प्रोत्साहन देण्यासाठी काम करणाऱ्या पुण्यातील प्रसिद्ध नोबल हॉस्पिटलाच्या डॉ. अदनानली सरकार (वय ४३) याला एनआयएने गुरुवारी अटक केली.

अदनानली सरकार हा पुण्यातील नोबल हॉस्पिटलचा प्रमुख आहे. एनआयएने अदनानली सरकारच्या कोंढवा घराच्या झडतीदरम्यान इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स आणि इसिसशी संबंधित अनेक दस्तऐवज यांसारखी अनेक साहित्य जप्त केली. साहित्यामुळे आरोपीची इसिस सोबतचे कनेक्शन आणि तरुणांना प्रेरित आणि भरती करून संघटनेच्या हिंसक योजनेला चालना देण्यात असलेली त्याची भूमिका उघड झाली. आरोपींनी इस्लामिक स्टेट, इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड लेव्हंट (आयएसआयएल), इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरिया (इसिस), विलायत खोरासान इस्लामिक स्टेट ऑफ इराक आणि शामासिक स्टेट यांसारख्या वेगवेगळ्या नावांनी ओळखल्या जाणार्‍या इसिस दहशतवादी कारवाया करण्याचा कट रचला होता.

एनआयएच्या तपासानुसार, अदनानली सरकार ही या प्रकरणातील ही पाचवी अटक असून मुंबई, ठाणे आणि पुणे येथे ३ जुलै २०२३ रोजी एनआयएने चार जणांना अटक केली होती. मुंबईतील तबिश नासेर सिद्दीकी, पुण्यातील जुबेर नूर मोहम्मद शेख, अबू नुसैबा, ठाण्यातील शरजील शेख आणि झुल्फिकार अली बडोदावाला अशी त्यांची नावे आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा