महाराष्ट्र

काय सांगता! शेतकऱ्यांनी घातले चक्क गाईचे डोहाळे जेवण

लाडकी गाईचे डोहाळ जेवण घालून एक अनोखा संदेश दिला

Published by : Shweta Shigvan-Kavankar

प्रशांत जगताप | सातारा : आपण आपल्या घरातील आईवर जेवढे प्रेम करतो तेवढेच प्रेम ग्रामीण भागात आजही शेतकरी गाईवर करतो. याचे उत्तम उदाहरण साताऱ्यातील वाढे गावात पाहायला मिळाले. या गावातील हेमंत नलावडे या शेतकऱ्याच्या परिवाराने आपली लाडकी गाई 'माऊलीचे' डोहाळ जेवण घालून एक अनोखा संदेश दिला.

गाईच्या पोटात 33 कोटी देव असतात, असे संबोधले जाते. त्याला कारण देशी गाईचे दूध लहान मुलांसाठी अमृता समान असते. तर देशी गाईचे गोमूत्र, शेणाचा सुद्धा वापर औषधी समजला जातो. त्यामुळे या गाईचे महत्त्व समजलेल्या हेमंत नलावडे यांना माऊली ही गाई त्यांच्या कुटुंबाचा एक अविभाज्य घटक बनली. यामुळे गाईचे सुद्धा डोहाळ जेवण घालण्याचा निर्णय या परिवाराने घेतला.

या अनोख्या डोहाळ जेवणाचा कार्यक्रम साजरा करण्यासाठी संपूर्ण गाव जमा झाला होता. माऊली या गाईची साडी आणि हार घालून महिलांकडून ओटी भरण्यात आली. मग, गोडधोड खायला घालून तिला ओवळण्यात आले. या कार्यक्रमाला नातेवाईकही मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते.

नलावडे कुटुंबाने शेतकऱ्यांना देशी गाईचे महत्व समजावे. यासाठी हा अनोखा उपक्रम राबवून एक आदर्श समाजासमोर ठेवला आहे. आज ग्रामीण भागातील शेतकरी खिल्लार, गीर जातीचे वाण प्रत्येकी घरटी घेऊ लागल्यामुळे पुढील काळात देशी गाईचे प्रमाणात वाढ होण्यास मदत होणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Mahayuti : महायुतीमध्ये महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला; भाजपच्या वाट्याला 48% पदं येणार

Latest Marathi News Update live : वाशिम जिल्ह्यात सलग 7 दिवसांपासून मुसळधार पाऊस

Ind Vs Eng Mohammed Siraj : इंग्लंडचा कार्यक्रम केला! मोहम्मद सिराजने इंग्लंडच्या 2 महत्त्वाच्या विकेट घेतल्या अन् पाहा काय झाल

Mobile Hang Problem: मोबाईल सतत होतोय हँग? जाणून घ्या कारण...