थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(BJP ) मुंबई महानगर पालिका निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळाल्याचे पाहायला मिळत आहे.29 महानगरपालिकांमध्ये भाजपा-शिवसेनेच्या महायुतीने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. मुंबई महानगर पालिका निवडणुकीचा निकाल हाती आला असून यामध्ये भाजपाने जोरदार मुसंडी मारली आहे.
महापालिका निवडणुकीत महायुतीने बाजी मारली असून 29 पैकी 24 पालिकांवर महायुतीची सत्ता आल्याचे पाहायला मिळत आहे.भाजपने जवळपास ९ महापालिकांमध्ये स्वबळावर सत्ता गाठली. २९ पैकी ९ महापालिका भाजपने स्वबळावर जिंकल्या असल्याचे पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आता भाजपकडून नवनिर्वाचित नगरसेवकांना सूचना देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
'पुढील आठ दिवस मुंबईबाहेर जाऊ नका' असे भाजपकडून नवनिर्वाचित नगरसेवकांना सूचना करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेत सत्तास्थापनेसाठी आठ ते दहा दिवस लागणार आहेत. त्यामुळे कोणीच मुंबईबाहेर जाऊ नये अशा सूचना नगरसेवकांना देण्यात आल्याची माहिती आहे.
Summary
'पुढील आठ दिवस मुंबईबाहेर जाऊ नका'
भाजपकडून नवनिर्वाचित नगरसेवकांना सूचना
मुंबई महापालिकेत सत्तास्थापनेसाठी आठ ते दहा दिवस लागणार आहेत