थोडक्यात
बच्चू कडूंचं आंदोलकांना आवाहन
चर्चा न झाल्यास रेल्वे ट्रॅक उखडून टाकू
बच्चू कडूंचा सरकारला इशारा
(Bacchu Kadu Farmers Protest ) शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी बच्चू कडू यांच्याकडून ट्रॅक्टरसह लाँग मार्च काढण्यात आला आहे. नागपूर वर्धा महामार्गावर ट्रॅक्टरने चक्का जाम करण्यात आला. रात्री रस्त्यावर ठिकठिकाणी चुली पेटल्या. शेतकऱ्यांनी संपूर्ण संसार रस्त्यावर मांडल्याचे पाहायला मिळाले.
बच्चू कडू आंदोलनावर ठाम असून जो पर्यंत मागण्या मान्य होणार नाही तो पर्यंत हटणार नाही असे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे. दुपारी 12 पर्यंत मागण्या मान्य न झाल्यास रेल्वे जाम करणार असल्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिला होता.
नागपूर वर्धा महामार्गावर ठिय्या असून वाहतूक ठप्प आहे. 12 वाजून गेल्यानंतर अल्टिमेटम संपल्यानंतर सर्व आंदोलक रेल्वे ट्रॅकवर उतरलेले पाहायला मिळाले. सरकार सोबत आमची चर्चा सुरू आहे, रेल्वेकडे जाणारे आंदोलन जाम करू नका, असं बच्चू कडू यांनीआंदोलकांना आवाहन केलं. मात्र चर्चा न झाल्यास रेल्वे ट्रॅक उखडून टाकू असा इशारा देखील बच्चू कडू यांनी सरकारला दिल्याची माहिती मिळत आहे. यातच आता अजून एक माहिती समोर येत आहे ती म्हणजे मंत्री पंकज भोयर आणी मंत्री आशिष जयस्वाल दुपारी 4 वाजता आंदोलन स्थळी येणार असल्याची माहिती मिळत आहे.
यावेळी बच्चू कडूंनी आंदोलनकांना सांगितले की, "आम्ही तुमचं ऐकत आहोत ना, मग तुम्हीपण ऐकलं पाहिजे की नाही. एवढं लोक जर आपण असलो, किती मोठा मोर्चा आहे . बावनकुळे इथे नाही आशिष जयस्वाल इथे आहेत. ते इथे येऊन काय बोलतात ते पाहू. त्यानंतर पुन्हा आपण चर्चा करु. तुमच्यासोबत चर्चा केल्याशिवाय काहीही होणार नाही."