थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Mahadev Jankar) 'आई शप्पथ सांगतो,कमळाला मतदान करू नका' असे वक्तव्य माजी मंत्री महादेव जानकर यांनी केलं आहे. महादेव जानकर यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
सांगलीच्या जत मध्ये महाविकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुजय शिंदे व उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित सभेमध्ये महादेव जानकर बोलत होते. महादेव जानकर म्हणाले की, "हात जोडून सांगतो, आई शप्पथ सांगतो, कुणालाही मत द्या, कमळाला मत देऊ नका. कारण भाजपा जाती- जातीत भांडण लावणार पक्ष आहे." असे महादेव जानकर म्हणाले.
Summery
'आई शप्पथ सांगतो,कमळाला मतदान करू नका'
माजी मंत्री महादेव जानकर यांचं वक्तव्य
भाजपा जाती-जातीत भांडण लावणारा पक्ष -जानकर