(Dr. Deepak Tilak Passed Away) लोकमान्य टिळकांचे पणतू आणि केसरी वृत्तपत्राचे संपादक डॉ. दीपक टिळक यांचे आज पहाटे पुण्यातील निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 74 वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे पुण्याच्या सांस्कृतिक, शैक्षणिक आणि पत्रकारितेच्या क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
आज सकाळी 8 ते 11 या वेळेत त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन टिळकवाडा (केसरीवाडा) येथे ठेवण्यात येणार आहे. दुपारी 12 वाजता वैकुंठ स्मशानभूमीत त्यांचे अंत्यसंस्कार होतील.
डॉ. टिळक यांनी पत्रकारिता, शिक्षण व सामाजिक कार्य क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले.
‘केसरी’सारख्या ऐतिहासिक वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांनी राष्ट्रप्रेम, मूल्यनिष्ठ विचार आणि लोकशिक्षणाचा संदेश पसरवला. 2021 मध्ये जपान सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून त्यांना जपानी भाषेच्या प्रसारासाठी विशेष सन्मान मिळाला होता. त्यांनी लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार समितीचे अध्यक्ष म्हणूनही काम केले होते.