थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Gauri Garje Case) मंत्री पंकजा मुंडेंचे पीए गरजे यांच्या पत्नीने गळफास घेऊन जीवन संपवलं. वरळीच्या बिडीडी चाळीतील हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नुकतेच आठ ते नऊ महिन्यापूर्वी गरजे दांपत्याचा विवाह झाला होता. मात्र पती यांचे अफेअर चालू असल्याने हा प्रकार झाला असल्याचा दाट संशय व्यक्त करण्यात आला आहे. सध्या पोलिसांकडून या प्रकरणात तपास केला जात आहे. ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप कुटुंबियांकडून केला आहे.
गौरीला आत्महेत्येपूर्वी किरणच्या आधीच्या पत्नीचे गर्भवती असल्याची कागदपत्र मिळाल्याने ती अस्वस्थ होती ती कागदपत्रे आम्हाला पाठवली होती असा गौरीच्या वडिलांनी जबाब दिला असून तिच्या वडिलांनी वरळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आणि अनंत गर्जेला देखील पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
याच पार्श्वभूमीवर आता गौरीच्या आई-वडिलांनी एसीपींना पत्र लिहिले आहे. आरोपी म्हणून अनंत गर्जे, शीतल आंधळे, अजय गर्जे या तीन नावांचा आरोप पत्रात उल्लेख केला असून इतर दोन आरोपी अजूनही मोकाट फिरत आहेत त्यांना अटक करण्याची गौरीच्या आई वडिलांनी पत्राद्वारे मागणी केली आहे. अनंत आणि गौरी यांच्या राहत्या घराच्या इमारतीवरील दिवसभरातील पूर्ण सीसीटीव्ही फुटेज मिळावा यासाठी देखील त्यांनी पत्राद्वारे मागणी केली आहे.
Summery
गौरी पालवे गर्जे प्रकरणात मोठी अपडेट
गौरीच्या आई-वडिलांनी लिहिले एसीपींना पत्र
आरोपी म्हणून अनंत गर्जे, शीतल आंधळे, अजय गर्जे या तीन नावांचा केला होता आरोप पत्रात उल्लेख